
दिनांक ०९/०२/२०२४ पुण्यात निर्भय बनो ह्या नियोजित कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार निखिल वाघळे जात असतांना भाजपच्या काही अंध भक्तांनी त्याची गाडी अडवून त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर हल्ला केला असून ह्या घटनेने महाराष्ट्राला काळिमा लावून बदनाम करण्याचे काम अंध भक्तांनी केले आहे.
महाराष्ट्र हा लोकशाही प्रणित राज्य आहे ह्या राज्यात मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्री हे पत्रकारांवर होणारे हल्ले उघड्या डोळ्यांनी पहात आहेत. लोकशाहीला काळिमा फासणारी ही घटना असून, आता पत्रकार बंधुचे देखील स्वतंत्र धोक्यात आले आहे.
देशातील सर्व पत्रकार बंधूनी ह्या घटनेचा निषेध केला आहे. वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज ठाणे जिल्हा सर्व प्रतिनिधी देखील ह्या घटनेचा निषेध करीत आहेत.
✊?लोकशाही जिंदाबाद! ✊?
✒️पत्रकार जिंदाबाद!!✒️
भ्याड हल्याचा जाहीर निषेध!निषेध!!निषेध!!!
????????????