
पाचोरा : रोटरी क्लब पाचोरा भडगाव यांचे तर्फे इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांना आयडियल स्टडी ऍप चे वितरण
दिनांक : ८ जुलै रोजी रोटरी क्लब पाचोरा भडगाव कडून कै पी के शिंदे माध्यमिक विद्यालय पाचोरा आणि उच्च माध्यमिक विद्यालय कोंडवाडा गल्ली पाचोरा येथे इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांना आयडियल स्टडी ऍप चे वितरण करण्यात आले. अत्यंत सुबक आणि सोप्या भाषेत दहावीचे पाठ्यपुस्तक, प्रश्न उत्तरे, बहुपर्यायी प्रश्न, पाठ्यपुस्तकावर आधारित व्हिडीओ, नोट्स, प्रश्नसंच, कृती आराखडा आणि दहावी नंतर करिअर मार्गदर्शन इतक्या गोष्टी या ऍप मध्ये आहेत. रोटरी पाचोरा भडगाव चे अध्यक्ष डॉ मुकेश तेली यांनी अध्यक्षीय भाषणात बोलताना सांगितले की पाचोरा भडगाव दोन्ही तालुके मिळून 5000 ऍप वितरण करण्याचा मानस आहे. दोन्ही शाळेमध्ये इंटरॅक्ट क्लब स्थापन केला. त्या अंतर्गत हा प्रोजेक्ट घेण्यात आला. रोटरी क्लब पाचोरा भडगाव चे अध्यक्ष डॉ मुकेश तेली, सचिव डॉ अजयसिंग परदेशी, शाळेचे डायरेक्टर अमोलभाऊ शिंदे, नीरज मुनोत, प्रोजेक्ट डायरेक्टर श्री संजय कोतकर, चंद्रकांत लोढाया, भरत सिनकर, डॉ बाळकृष्ण पाटील, डॉ अमोल जाधव, डॉ गोरख महाजन, डॉ प्रशांत सांगडे, डॉ कुणाल पाटील, डॉ राहुल काटकर, डॉ तौसिफ खाटीक, डॉ सिद्धांत तेली, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.