
पाचोरा :- कै पी के शिंदे विद्याल शालेय विद्यार्थ्यांना पॉकसो , NALSA या वर मार्गदर्शन रोटरी क्लब पाचोरा भडगाव व अखिल भारतीय ग्राहक पंचायत ……
पाचोरा :- तालुका विधी समिती व रोटरी क्लब पाचोरा भडगाव यासोबत अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आज मंगळवार, दिनांक 11 मार्च 2025 रोजी कै पी के शिंदे विद्यालय पुनगाव रोड पाचोरा येथे शालेय विद्यार्थ्यांना पॉकसो , NALSA या वर मार्गदर्शन शिबिर, ग्राहक मार्गदर्शन तसेच नागरिकांचे मूलभूत अधिकार या संदर्भात शिबीर आयोजीत करण्यात आले होते. या शिबिराला प्रमुख मार्गदर्शन पाचोरा तालुका विधी सेवा समिती सदस्य डॉ मुकेश नैनाव (तेली), सदस्य सौ ललिता पाटील आणि प्रा डॉ सुनीता गुंजाळ तसेच रोटरी क्लब पाचोरा भडगाव चे अध्यक्ष डॉ पवनसिंग पाटील, अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे जिल्हाध्यक्ष डॉ अनिल देशमुख, सुधाकर पाटील, तालुका अध्यक्ष संजय पाटील, महाविद्यालय चे मुख्याध्यापक सुकदेव गिते सर, नेरकर सर तसेच सूत्रसंचालन हेमंत टोनपे सर यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी विद्यार्थी विद्यार्थिनी भरपूर संख्येने उपस्थित होते.