महाराष्ट्रमुंबई

राज अन् उध्दव ठाकरे एकत्र आल्यास मुंबई महानगरपालिका कोणाची.?

ठाकरे बंधू विरोधकांना धोबीपछाड देतील का.

राज अन् उध्दव ठाकरे एकत्र आल्यास मुंबई महानगरपालिका कोणाची.?

ठाकरे बंधूचं मनोमिलन सत्ताधाऱ्यांसाठी किती धोबीपछाड ठरू शकते.

मुंबई : २००७ च्या निवडणुकांपासून ठाकरे बंधू आमने-सामने आले. मात्र आता राज ठाकरेंनी एकत्र येण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.
पण दोन्ही भावांमध्ये युती झालीच तर पहिली निवडणूक मुंबई महापालिकेचीच असेल. २०१७ मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस होते आणि भाजप-शिवसेना युती असतानाही भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढले.
मुंबई महापालिकेच्या एकूण जागा २२७ आहेत. शिवसेनेचे ८४ नगरसेवक जिंकले तर भाजपचे ८२ नगरसेवक आले आणि मनसेच्या ७ जागा निवडून आल्या. शिवसेनेची मतांची टक्केवारी होती २८ टक्के आणि भाजपने २७ टक्के मतं घेतली तर मनसेच्या मतांची टक्केवारी आहे ८ टक्के. २०१७ आणि २०२५ या सात वर्षांच्या कालावधीत आता मतदारांची संख्या वाढलेली आहे.
मात्र २०१७ ची ठाकरे बंधूंची मतांची आकडेवारी लक्षात घेतल्यास ३६ टक्के मतं होतात. म्हणजे मुंबई विशेषतः मराठी मतांचा टक्का निर्णायक असलेल्या ठिकाणी ठाकरे बंधूंचं एकत्र येण हे सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी ठरू शकतं.

Show More
Back to top button
error: Content is protected !!