महाराष्ट्रमुंबई

आतंकवाद्यांची भाषा समजण्यासाठी पहिलीपासून उर्दू भाषा शिकविण्यात यावी

शिवसेना नेते संजय गायकवाड यांचें वादग्रस्त वक्तव्य.

आंतकवाद्यांची भाषा समजण्यासाठी पहिलीपासून उर्दू भाषा शिकविण्यात यावी…
शिवसेना नेते संजय गायकवाड यांचें वादग्रस्त वक्तव्य.

आता नवा वाद.?

हिंदी भाषाच नाही तर उर्दू भाषाही पहिलीपासून शिकवली पाहिजे, असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय गायकवाड यांनी केलंय. आपल्याला उर्दू भाषा समजत नाही, आंतकवाद्यांची भाषा समजत नाही म्हणून ते पकडले जात नाहीत, असंही संजय गायकवाड यांनी म्हटलंय. दरम्यान, उर्दू भाषाही पहिलीपासून शिकवली असं भुवया उंचावणारं वक्तव्य केल्याने संजय गायकवाड आता चांगलेच चर्चेत आले आहेत.
जे कोणी म्हणतं हिंदी शिकवली गेली नाही पाहिजे, हिंदी राष्ट्र भाषा नाही. पण ज्यावेळी आम्ही महाराष्ट्राबाहेर जातो तेव्हा आम्ही फक्त मराठी थोडी बोलतो. जर मराठी शिवाय आपल्याला कोणतीच भाषा आली नाही तर आपण तिथे काय करायचं. आपलं पोरगं जगात फिरायला जाईल तर त्याला जगातील भाषा आली पाहिजे’, असं संजय गायकवाड म्हणाले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीपासूनच हिंदी भाषा सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्याला मनसेकडून विरोध करण्यात आला. हिंदी भाषा सक्तिवरून सुरू असलेल्या वादादरम्यान, सरकारकडून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय स्थगित करण्यात आला.

Show More
Back to top button
error: Content is protected !!