महाराष्ट्रमुंबई

जे बापाचे झाले नाहीत ते जनतेचे काय होणार.?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल.

आम्ही तुमचा बाप चोरला नाही तर हृदयात ठेवला.
जे बापाचे झाले नाहीत ते जनतेचे काय होणार.?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल.

मुंबई : ठाकरे आणि शिंदे गटात आता बापावरून वाद सुरू झाला आहे. जे बापाचे झाले नाही ते जनतेचे काय होणार.
आम्ही तुमचा बाप चोरला नाही, तर हृदयात ठेवला, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना लगावला आहे.
तर शिंदेंनी बाळासाहेबांचा कॉंग्रेस संदर्भातला जुन्या व्यक्तव्याचा व्हिडिओ देखील यावेळी दाखवला आहे.
उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या शिबिरात बोलताना मला कोणाचा बाप चोरण्याची गरज नाही, असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यानंतर शिंदेंनी देखील यावर प्रत्युत्तर देत पालटवर केला आहे.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, बाप चोरला, बाप चोरला असं रडगाण काल सुरू होतं. आम्ही बाप चोरला नाही. तो कायम हृदयात पूजला. यापुढेही पूजत राहू. पण तुम्ही पाप झाकण्यासाठी त्यांचा आवाज चोरला,’ असं म्हणत शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा एक जून व्हिडीओ दाखवला आहे. उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या शिबिरात बोलताना मला कोणाचा बाप चोरण्याची गरज नाही, असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यानंतर शिंदेंनी देखील यावर प्रत्युत्तर देत पालटवर केला आहे.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, बाप चोरला, बाप चोरला असं रडगाण काल सुरू होतं. आम्ही बाप चोरला नाही. तो कायम हृदयात पूजला. यापुढेही पूजत राहू. पण तुम्ही पाप झाकण्यासाठी त्यांचा आवाज चोरला,’ असं म्हणत शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा एक जून व्हिडीओ दाखवला आहे. त्यामुळे आता दोन्ही शिवसेनेत बापावरून राजकारण पेटलेलं बघायला मिळत आहे.

Show More
Back to top button
error: Content is protected !!