
उत्तर भारतीयांच्या विरोधात मनसे पुन्हा आक्रमक.!
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे, मनसेची मान्यत्ता रद्द करण्याची मागणी करणारी याचिका उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी केली आहे.
उत्तर भारतीयांविरोधात राज ठाकरे द्वेष पसरवत असल्याचा आरोप केला आहे. त्यावर मनसेचे मुंबई शहरध्यक्ष संदीप देशपांडे यांनी भैय्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहू द्यायचं का यावर विचार करावा लागेल, असा थेट इशाराच दिला आहे.
उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत..यासंदर्भात मनसेचे मुंबई शहरध्यक्ष संदीप देशपांडे यांनी मराठी माणसाचा पक्ष बंद व्हावा म्हणून भैय्ये प्रयत्न करणार असतील तर भैय्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहू द्यायचं का यावर विचार करावा लागेल असा इशाराच संदीप देशपांडे यांनी दिलाय.
उत्तर भारताीयांबद्दल राज ठाकरे द्वेष पसरवत असल्याचा आरोप करत मनसेची मान्यता रद्द करावी तसंच राज ठाकरें हिंदू विरोधक असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आलीय. यासंबंधी निवडणूक आयोग, गृहमंत्रालयाला देखील त्यांनी पत्र पाठवलं. मराठी न बोलणाऱ्या लोकांना मारहाण करणे त्यांच्या विषयी द्वेषपूर्ण भाषा बोलणे. द्वेष पसरवणे. दमदाटी करणे यामुळे मनसेची मान्यता रद्द करण्यात यावी तसेच राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीला घेऊन सर्वोच्च न्यायालयात उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी याचिका केली आहे तसेच यासंबंधी निवडणूक आयोग, गृहमंत्रालय यांना देखील पत्र पाठवण्यात आले आहे.