
पाथरी,(29जाणे 2024)पाथरी शहरातील दृष्टिकोन फाउंडेशन व द जयवर्धन क्लासेस च्या माध्यमातून पाथरी तालुक्यातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजनेतून 50 गरजवंत व हुशार विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचा नीट व JEE संपूर्ण खर्च दृष्टिकोन फाउंडेशन करणार असल्याची माहिती फाउंडेशनचे ॲड हर्षवर्धन नाथभजन यांनी दिली, सदरील परीक्षा ही तीन टप्प्यात घेण्यात येणार असून त्यातील पहिला टप्पा शहरी भागातील 10 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड चाचणी आज कै.स.गो. नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवनांद्रा या शाळेत घेण्यात आली, सदरील निवड चाचणी शहरातील 540 विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
पाथरी तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्याकरिता अशीच निवड चाचणी जानेवारी महिन्यात घेण्यात येणार असल्याचे ही ॲड .हर्षवर्धन यांनी सांगितले.ग्रामीण भागात डॉक्टर आणि इंजिनियर घडवण्याच्या दृष्टीने द जयवर्धन एन क्लासेस पाथ्री चे संचालक इंजि एन जयवर्धन सर यांच्या माध्यमातून गेली 4 वर्षापासूनच शहरात NEET ची तयारी केल्या जाते. यातून अनेक विद्यार्थ्यांचे डॉक्टर इंजिनिअर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.ही संधी आता ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना मिळावी म्हणून 50 विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचा निर्णय इंजि जयवर्धन सराणी घेतल्याचे सांगितले.या परीक्षेत इंजि.पूजा मॅडम, सोनिया गायकवाड मॅडम, प्रा.रमेश विरकर, सुनील कोरडे सर,प्रशांत कांबळे सर,अर्जुन शेगर सर यांचे सदोष पर्यवेक्षण लाभले.शाळेचे मुख्याध्यापक श्री बी आर होगे सर यांचे विशेष सहकार्य लाभले.