महाराष्ट्रमुंबई

वक्फ बोर्डाची संपत्ती ही मुस्लिम समाजांनी दान केलेली संपत्ती आहे.

एमआयएम चे नेते इम्तियाज जलील यांचें मोठे विधान.

एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी वक्फ बोर्डाची संपत्ती ही मुस्लिम समाजाची आहे. मुस्लिम लोकांनी दान केलेली ही संपत्ती आहे. सरकारकडे बहुमत असल्याने ते हे बिल पास करून घेतील. मात्र आमची देखील तयारी आहे. बिल पास झालं तर आम्ही कोर्टात जाऊ. कारण आम्हाला अजूनही देशाच्या न्यायप्रणालीवर विश्वास आहे.

वक्फ बोर्डाची संपत्ती ही मुस्लिम समाजाची संपत्ती आहे, असं एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी म्हंटलं आहे. वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्यास कोर्टात जाऊ असंही त्यांनी म्हंटलं आहे. वक्फ विधेयक आज संसदेत मांडलं जात आहे.
वक्फ विधेयकाला याआधी विरोधकांनी जोरदार विरोध केला होता. यानंतर आता पुन्हा एकदा सुधारित वक्फ विधेयक आज लोकसभेत मांडलं गेलं आहे. त्यावर चर्चा देखील झाली आहे. त्यानंतर आता यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.

Show More
Back to top button
error: Content is protected !!