महाराष्ट्रमुंबई

आम्ही जय श्रीराम बोलू पण भाजपाला जय भवानी जय शिवराय बोलायला लावू.

उद्धव ठाकरे यांचे मोठे विधान.

आम्ही जय श्रीराम बोलू पण भाजपाला जय भवानी जय शिवराय बोलायला भाग पाडू.
उद्धव ठाकरे.

मुंबई : विराम पवार

शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी रविवारी ईशान्य मुंबईत निर्धार शिबीर घेतले. या शिबिरातून त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली.
रविवारी चॅम्पियन ट्रॉफीचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंडमध्ये सुरु होता. त्याचा संदर्भ घेत त्यांनी विरोधकांची दांडी उडवणार असल्याचे सांगितले.
महाराष्ट्रात आपली सत्ता मी आणणार, त्यांना सोडणार नाही. आम्ही जय श्रीराम बोलू, पण भाजपला जय शिवाजी, जय भवानी बोलण्यास लावू.
प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे मंदिर उभारणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
राज्य मी आणणार, त्यांना सोडणार नाही, भाजप देशप्रेमी आहे, हे फेक नेरेटीव्ही आहे. जोपर्यंत पाकिस्तान आपल्या देशासंदर्भात चांगली भूमिका घेत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत सामना खेळू नये, ही भूमिका शिवसेना प्रमुखांची होती. परंतु ते आता आम्हाला देशप्रेम शिकवत आहे.
क्रिकेट सामन्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले की, मला स्कोअरची चिंता नाही. विरोधकांची दांडी उडवणार आहे. सामना दुबईत सुरु आहे. टीव्हीवर सामना बघू शकतो. त्यासाठी दुबईत जाण्याची काय गरज? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मानणारे सांगणारे लोक दुबईत गेले होते. ते भारत पाक सामना पाहात होते. फोटो काढत होते. पाकिस्तानी खेळाडू शेजारी बसले होते. भाजप नेत्यांचे घराणेशाही वाले जय शाह गेले होते. ती लोक आम्हाला हिंदुत्व शिकवणार आहे का. उद्धव ठाकरे गेले असते किंवा आदित्य ठाकरे दुबईत गेले असते तर गदारोळ केला असतात. मोहन भागवत मशिदीत जातात. उद्धव ठाकरे गेले नाही अजून पण गेल्यावर त्यांनी काय केले असते? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला.

Show More
Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!