महाराष्ट्रमुंबई

दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची पुरावे उध्दव ठाकरे यांनी नष्ट केले.

शिवसेना नेते रामदास कदम यांचा गंभीर आरोप.

उद्धव ठाकरेंनी पोलिसांना हाताशी धरून दिशा सालियान मृत्यू प्रकरणी पुरावे नष्ट केले.

शिवसेना नेते रामदास कदम यांचा गंभीर आरोप.

मुंबई : विराम पवार

मुंबई : दिशा सालियन प्रकरणाच्या पुनर्चौकशीसाठी तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने आता या प्रकरणावरून उलटसुलट चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
आदित्य ठाकरे यांचा दिशा सालियन प्रकरणात संबंध असल्याचे नारायण राणे सुरुवातीपासूनच बोलत होते. पण दुर्दैवाने ते पुरावे देऊ शकले नाहीत. ज्या मुलींच्या संरक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी कडक भूमिका घेतली त्यांचा मुलगा आणि नातवावर असे आरोप होत असतील तर ही बाब अत्यंत गंभीर आहे.
दिशा सालियनच्या मृत्यूची चौकशी करण्यासंदर्भात तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. न्यायालयाने चौकशीचा आदेश दिला तर याचा खोलवर तपास होईल’, असे कदम म्हणाले.
दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, आमदार आदित्य ठाकरे यांच्यावरही यानिमित्ताने निशाणा साधला आहे. साहजिकच यावरून सत्ताधाऱ्यांनी विधिमंडळाच्या सभागृहात आदित्य ठाकरे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडायला सुरुवात केली आहे.
शिवसेनाप्रमुखांचे नातू आदित्य ठाकरे यांच्यावर बलात्काराचा आरोप होणे ही गंभीर बाब आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना थोडीशी जरी लाज असती तर ते देश सोडून गेले असते अशी बोचरी टीका शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी गुरुवारी केली. पोलिसांना हाताशी धरून उध्दव ठाकरेंनी पुरावे नष्ट केले आहेत का याची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Show More
Back to top button
error: Content is protected !!