
पत्रकार, लिंगेश्वर सातपुते
चांदापुरी दि.25/05/25
चार दिवसांपासून चांदापुरीसह परिसरात अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले असून वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या लहान,मोठ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून येत आहे , तर चांदापुरी च्या आठवडा बाजारात पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीमुळे व्यापारी वर्गाची मोठी दानादान उडाल्याचे चित्र आहे .
रविवार हा चांदापुरीचा आठवडी बाजार असून या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेकांची धावपळ झाली.
बाजार निमित्त छोट्या व्यवसायिकांनी लावलेल्या दुकानातील भाजीपाला ,व कापड वर्गाचे मोठे नुकसान झाले दिसून येत आहे . चांदापूरी सह परिसरातील शेतकऱ्यांनी जनावरांसाठी केलेले कढवळ सारखी पिके खाली पडून सपाट झालेली दिसून येत आहे … त्यामुळे येणाऱ्या दिवसात जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे ,तर वैरणीचे दर गगनाला भिडणार आहेत..


