
पुणे:- निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आल्यानंतर आता कार्यालये ताब्यात घेण्याची स्पर्धा दोन्ही गटाकडून सुरु झाली आहे.
तर पुण्यात शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पुण्यातील कार्यालयावरील घड्याळ चिन्ह हटवलं. यावेळी कार्यालयावरील चिन्ह काढताना जगताप यांना अश्रु अनावर झाले.
जगताप यांनी त्यांच्या गाडीवरील घड्याळ चिन्ह सुद्धा काढून टाकले आहे. 24 वर्षापासून कार्यालय पाहत असताना हे दिवस येतील, असे वाटलं नव्हतं, आमच्या दृष्टीने शरदचंद्रजी पवार हाच आमचा पक्ष व हाच आमचा चिन्ह, ज्या नेत्यामुळे आम्हाला आतापर्यंतचा प्रवास शक्य झाला आहे त्या नेत्यामागे खंबीरपणे उभा राहणे हाच आमच्यासाठी समाधानाची बाब आहे अशी भावनिक प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी दिली.