
नवी दिल्ली | 7 फेब्रुवारी 2024 : 2014 पासून भाजपने लोकसभा त्यासोबत अन्य राज्यात झालेल्या निवडणुका या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर जिंकल्या आहेत. 2019 च्या निवडणुकामध्ये तर भाजपच्या मोदी लाटेत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली. नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडगोळीने आपल्या युक्तीने देशातील एकेका राज्यात भाजपची सत्ता आणली. आताही 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी भाजप करत आहे. यावेळीही पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून भाजपने पुन्हा एकदा मोदी यांनाच पुढे आणले आहे. मात्र, भाजप आज सर्व निवडणुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर जिंकत असला तरी पुढे काय? असा प्रश्न समोर आला आहे.नवी दिल्ली | 7 फेब्रुवारी 2024 : 2014 पासून भाजपने लोकसभा त्यासोबत अन्य राज्यात झालेल्या निवडणुका या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर जिंकल्या आहेत. 2019 च्या निवडणुकामध्ये तर भाजपच्या मोदी लाटेत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली. नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडगोळीने आपल्या युक्तीने देशातील एकेका राज्यात भाजपची सत्ता आणली. आताही 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी भाजप करत आहे. यावेळीही पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून भाजपने पुन्हा एकदा मोदी यांनाच पुढे आणले आहे. मात्र, भाजप आज सर्व निवडणुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर जिंकत असला तरी पुढे काय? असा प्रश्न समोर आला आहे.
भाजपला देशात जनाधार नसताना निवडणूक रणनीतीकार म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर त्यांच्या सोबतीला आले. भाजपला त्यांनी निवडणूक जिंकून दिली. मात्र, त्यानंतर त्यांचे भाजपसोबत बिनसले. भाजप, काँग्रेस, टीएमसी यासारख्या काही पक्षांसाठी प्रशांत किशोर यांनी काम केले आहे. याच रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी हा प्रश्न उपस्थित केलाय.
‘नरेंद्र मोदी सतत आपली प्रतिमा बदलत आहेत. त्यामुळेच त्यांना सातत्याने निवडणुकीत यश मिळत आहे. पंतप्रधान मोदी ही भाजपची मोठी ताकद आहे. पण, भाजपसाठी सर्वात मोठी समस्याही तीच आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भाजप जास्त अवलंबून आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपचे नेतृत्व कोण करणार असा प्रश्न आल्यास त्यांच्यानंतर हायकमांडमध्ये जो कोणी असेल तो त्यांच्यापेक्षाही जास्त कट्टर असेल असे प्रशांत किशोर म्हणाले आहेत.
प्रशांत किशोर यांनी भाजप आणि जेडीयूमधील संबंधांवरही भाष्य केले. भाजपने जेडीयूला आधीच गिळंकृत केले आहे. नितीश कुमार यांना हे माहित आहे. पण, जो काही वेळ शिल्लक आहे तितका काही काळ त्यांना मुख्यमंत्रीपदावर राहायचे आहे. 18 वर्षे ते बिहारचे मुख्यमंत्री आहेत. आता त्यांच्या खेळीचा हा शेवटचा टप्पा आहे असेही ते म्हणाले.