
शिर्डी : मंदिरात भक्ताने दिलेला पैसा ताब्यात घेण्याचा सरकारला अधिकारच काय?, महंत रामगिरी महाराज यांचा सवाल
महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेचे दोन दिवसीय अधिवेशन शिर्डी येथे आयोजित केले आहे. राज्यभरातील एक हजाराहून अधिक मंदिर प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत.मंदिरांचा पैसा मंदिरांसाठी वापरला जावा
यावेळी सरला बेटचे महंत रामगिरी महाराज यांनी या परिषदेस उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी ते म्हणाले की ज्या मंदिरात उत्पन्न दिसायला लागते ते मंदिर सरकार ताब्यात घेत असते. शेकडो हजारो कोटींचे व्यवहार होणारे इतर धर्मियांची मंदिरे सरकारच्या ताब्यात नाहीत. मंदिरात भक्ताने दान केलेला पैसा सरकारने ताब्यात घेण्याचा अधिकारच काय ? असा सवाल महंत रामगिरी महाराज यांनी उपस्थित केला आहे. हा पैसा केवळ देवस्थान किंवा इतर मंदिरासाठी वापरला जावा असेही मत यावेळी रामगिरी महाराज यांनी व्यक्त केला आहे.