
पाचोरा :- पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन, रोटरी आणि आर्यन ग्रुप यांच्या मदतीने झाली आजी आणि मुलीची भेट
काल दि 25 एप्रिल रोजी निंबायंती ता सोयगाव येथील आजी धर्माबाई आपल्या मुली सोबत श्री गोविंद समर्थ हॉस्पिटल येथे तपासणी करून घरी निंबायंती येथे परत जाताना एस टी मध्ये चढताना गर्दी असल्याने आजी आणि तिची मुलगी हिची तुटातूट झाली.
सायंकाळी हि गोष्ट पाचोरा डॉक्टर असोसिएशन आणि रोटरी सदस्य डॉ मुकेश तेली, डॉ प्रतिभा तेली यांना समजताच त्यांनी आर्यन ग्रुपचे आर्यन मोरे यांना बोलावून आजीला शोधणे कामी मदत केली. पाचोरा पोलीस स्टेशन कर्मचारी यांनी देखील या कामी मदत केली. अशा रीतीने आजी आणि मुलीची भेट घडवून माणुसकीचे दर्शन पाचोरा रोटरी आणि आर्यन ग्रुप यांनी घडवून आणले. नातेवाईक मंडळी यांनी सर्वांचे आभार मनात आनंद व्यक्त केला