
दिनांक 25/02/2025
जालना जिल्हा प्रतिनिधी संदीप पा नवल
आमदार संतोष पाटील दानवे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये सलग तिसऱ्यांदा विजय मिळवल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्याची दखल घेवुन पंचायतराज समितीच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल भोकरदन येथील छ.शिवाजी महाराज चैक येथे भाजपाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी फटाके फाडुन व पेढे वाटुन जल्लोष साजरा केला.
आमदार संतोष पाटील दानवे यांची आजवरची विकासभिमुख कारकिर्द विचारत घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांची पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी निवड करणेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस केली होती. त्यानुसार आज मुंबई येथे मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार संतोष पाटील दानवे यांची पंचायतराज समितीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. आमदार संतोष पाटील दानवे यांची पंचायतराज समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना-रा.काॅ. महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. पंचायतराज विभागासारख्या ग्रामीण भागाशी नाळ जोडल्या गेलेल्या विभागावर आमदार संतोष पाटील दानवे यांची निवड झाल्यामुळे त्यांच्या माध्यमातुन भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील ग्रामीण भागाचा विकास करणे त्यांना शक्य होणार आहे. त्यामुळे आमदार संतोष पाटील दानवे यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.
कार्यालय प्रमुख
भारतीय जनता पार्टी, भोकरदन जि.जालना