
पाचोरा : रोटरी क्लब पाचोरा भडगाव यांचे तर्फे २ शाळांना प्रथमोपचार पेटी व आयडियल एप चे वाटप
प्रकल्प – रोटरी क्लब पाचोरा भडगाव ने आज माध्यमिक विद्यालय साजगाव ता पाचोरा व महात्मा फुले हायस्कुल भोजे ता पाचोरा येथे या दोन्हीशाळे मध्ये प्रथमोपचार पेटी आणि आयडियल स्टडी ऍप चे वितरण केले. या प्रसंगी रोटरी क्लब पाचोरा भडगाव चे अध्यक्ष डॉ मुकेश तेली, सचिव डॉ अजयसिंग परदेशी, प्रकल्प प्रमुख संजय कोतकर, चंद्रकांत लोढाया, भरत सिनकर, डॉ प्रशांत सांगडे, डॉ कुणाल पाटील, डॉ सिद्धांत तेली यासोबत दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक रत्नराज साळुंखे सर, पाटील सर, चौहान सर, सोनवणे सर, उभाळे सर, पाटील सर सर्वं विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे आणि उप प्रांतपाल किरण देशमुख यांच्या प्रेरनेने पाचोरा भडगाव दोन्ही तालुक्यातील 100 शाळांना प्रथमोपचार पेटी यावेळी अध्यक्ष डॉ मुकेश तेली यांनी शाळेला भेट दिली. अध्यक्ष डॉ मुकेश तेली यांनी रोटरीचे समाजाभिमुक कार्याचा गौरव सांगितला. त्यावेळी त्यांनी खेड्यावरून ये जा करणारे विद्यथिनी भगिनी यांना लौकरच रोटरी क्लब पाचोरा भडगाव यांचेकडून सायकल देण्याचे आश्वासन दिले.