महाराष्ट्र

भडगाव : रोटरी क्लब पाचोरा भडगाव यांच्याकडून लाडकूबाई शाळेत विद्यार्थ्यांना तानतणाव व्यवस्थापन यावर मार्गदर्शन

भडगाव : रोटरी क्लब पाचोरा भडगाव यांच्याकडून लाडकूबाई शाळेत विद्यार्थ्यांना तानतणाव व्यवस्थापन यावर मार्गदर्शन

  • भडगाव : रोटरी क्लब पाचोरा भडगाव यांच्याकडून लाडकूबाई शाळेत विद्यार्थ्यांना तानतणाव व्यवस्थापन यावर मार्गदर्शन

 

दि 18 सप्टेंबर 2025 रोजी लाडकूबाई हायस्कुल भडगाव *सशक्त मन व उत्तम भविष्य यासोबत तानतणाव व वेळ व्यवस्थापन* यावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शन रो डॉ प्रशांत सांगडे यांनी केले. डॉ मुकेश तेली अध्यक्ष रोटरी क्लब पाचोरा भडगाव यांनी रोटरीचे अनेक नवनवीन उपक्रम याबद्दल माहिती दिली. रो संजय कोतकर यांनी स्टडी ऍप बद्द्ल संपूर्ण माहिती दिली.सदर कार्यक्रमासाठी रोटरी चे अध्यक्ष डॉ मुकेश तेली, सचिव डॉ.अजयसिंग परदेशी यासमवेत चंद्रकांत लोढाया, भरत सिनकर, संजय कोतकर, डॉ प्रशांत सांगडे, भडगाव चे प्रसिद्ध उद्योजक रो शैलेश तोतला तसेच अनेक रोटरी क्लब पाचोरा भडगाव चे सदस्य यासोबत शाळेच्या प्राचार्या पाटील मॅडम, उपमुख्याध्यापक पाटील सर, जोशी सर यासमवेत अनेक शिक्षक शिक्षिका तसेच शाळेतील जवळपास 450 विद्यार्थिनी भगिनी कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यानंतर शाळेतील 100 विद्यार्थ्यांना स्टडी ऍप चे वाटप करण्यात आले.

 

Show More
Back to top button
error: Content is protected !!