
बहुचर्चित हिंदी चित्रपट छावा मधील लेझीम नृत्याच्या प्रसंगाला कात्री दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचे राज ठाकरे यांच्या भेटी नंतर स्पष्टीकरण.
मुंबई प्रतिनिधी
. मुंबई : प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या छावा ह्या हिंदी चित्रपट’मधील लेझीम नृत्याच्या प्रसंगाला विरोध केल्याने राज ठाकरे यांच्या भेटीनंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचे स्पष्टीकरण.
छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास मांडणारा बहुप्रतीक्षित ‘छावा’ या हिंदी चित्रपटाच्या ट्रेलरवरून वादंग निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ‘छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर आणि राजकीय मंडळींसह अनेकांनी या प्रसंगाला घेतलेला आक्षेप विचारात घेऊन चित्रपटातील वादग्रस्त लेझीम नृत्याचा प्रसंग काढला जाणार असल्याचे दिग्दर्शक उतेकर यांनी स्पष्ट केले. तसेच हा चित्रपट प्रदर्शनाआधी इतिहासतज्ज्ञांनाही दाखविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.