COVID-19Lok Sabha Chunav 2024Uncategorizedअन्य खबरेताज़ा ख़बरें
Trending

शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्य महिला आघाडीच्या शाखेचे उदघाटन

शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्य महिला आघाडीच्या शाखेचे उदघाटन

प्रेस नोट

शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्य महिला आघाडीच्या शाखेचे उदघाटन

प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित व वंदनीय बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर छत्रपतींचा भगवा ध्वज घरोघरी पोहचविणाऱ्या शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन पूर्व नागपुरात अनेक ठिकाणी साजरा करण्यात आला. यात प्रामुख्याने हिवरी नगर येथील शिवस्मारकाला व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला शिवसेनेचे विधानसभा संघटक महेंद्र कठाने यांच्या शुभहस्ते माल्यार्पण करण्यात आले. भारत नगर येथील उद्यानात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून प्रभाग -२४ मध्ये उपजिल्हा प्रमुख हरी बाणाईत यांच्या नेतृत्वात मिठाईचे वाटप करण्यात आले. भांडेवाडी परिसरात गिरीजा नगर येथे जिल्हा संघटिका सुरेखा खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर प्रमुख शारदा मेश्राम यांच्या नेतृत्वात महिला आघाडीच्या प्रभाग २५ चे शाखेचे उदघाटन शिवसेनेचे विधानसभा संघटक महेंद्र कठाने व विभाग प्रमुख सौ. रंजना राजपान्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत शाखेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी प्रामुख्याने शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख हरिभाऊ बाणाईत, राजेश राजपान्डे , स्नेहा मेश्राम, पूजा आडीकने, मालती खड्गकर, सुनीता शेंडे, सारिका मानवटकर, भाविका बांते, अश्विनी गजभिये, कल्पना मेश्राम, प्रियंका गरवडे , मंगला राणे, मंगेश मेश्राम, शुभम मेश्राम, जयपाल निबार्ते, राजेश शेंडे,अनिल पाल, पंकज दाणी, करण कुडे, युग आदिकने, तेजस मानवटकर, राहुल सेन, देवेंद्र राणे, स्वप्नील नंदर्धने आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन स्नेहा मेश्राम यांनी केले आभार प्रदर्शन शारदा मेश्राम यांनी केले.

प्रति
मा. संपादक साहेब
आपल्या लोकप्रिय दैनिकात बातमी प्रकाशित करावी हि विनंती.

Show More
Back to top button
error: Content is protected !!