Lok Sabha Chunav 2024Uncategorizedअन्य खबरेताज़ा ख़बरेंमहाराष्ट्र

माउंट इंग्लिश मिडीयम स्कूल बल्लारपूरचा एस एस सी परीक्षेत १००%निकाल

संजय पारधी बल्लारपूर महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे मार्फत १0वीचा निकाल जाहीर करण्यात आला. चंद्रपूर मल्टीपर्पज एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित माउंट इंग्लिश मीडियम स्कूल बल्लारपूरने आपली उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत याही वर्षी १००% टक्के निकाल लावत शाळेच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश प्राप्त केले.
शाळेची विद्यार्थिनी कु. मानसी विलास भटारकर हिने ८९.६० % गुण प्राप्त करत शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवला. तर मानसी नरड हिने ७९. ८० % गुण प्राप्त करून शाळेतून द्वितीय आली. तर तृतीय क्रमांक कु. समृद्धी मालखेडे हिने ७८.४०% गुण संपादन केले. आदित्य गेडाम, कु. उज्जैनि खोब्रागडे तसेच कु. कल्याणी पिंपळकर यानी ७७.00% गुण प्राप्त केले व शाळेतून चौथा क्रमांक मिळवला . तर शाळेतून पाचव्या क्रमांकावर आकांशा सातपुते हिला ७६ .४०% गुण मिळाले. एस .एस. सी बोर्ड परीक्षेत शाळेतून ३० विद्यार्थी परीक्षेला बसले होते यातून ०७ विद्यार्थ्यांनी प्राविण्यासह गुण प्राप्त केले. 0८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री भाऊराव झाडे तसेच संस्थेचे सचिव तथा शाळेचे मुख्याध्यापक श्री शैलेश झाडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी शाळेच्या उप मुख्ाध्यापिका कु. रूपाली जीवने मॅडम , प्राध्यापक श्री नंदकिशोर काकडे, प्राध्यापक श्री चेतन गाजर्लावार , श्री रमीज शेख सर ,सौ. अर्चना अमराज मॅडम, शिक्षक इतर कर्मचारी तथा पालक वर्ग उपस्थित होते.

Show More
Back to top button
error: Content is protected !!