Uncategorizedअन्य खबरेताज़ा ख़बरेंनासिकमहाराष्ट्रमौसम

जलवाहिनी फुटल्याने कांद्याच्या शेतात पाणी शिरले ; यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

जलवाहिनी फुटल्याने कांद्याच्या शेतात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर, मालेगाव : यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने नदी-नाल्यांसह लघु व मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत, तर जानेवारी महिन्यापासून विहिरींनी तळ गाठला. टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. अशातच दुष्काळात तात्पुरता दिलासा मिळावा, यासाठी गिरणा धरणातून सोडण्यात आलेली पाण्याची जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी मातीमोल गेले आहे. 

       पावसाळ्यात पुरेसा पाऊस न झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. आर्थिक संकटातून सावरण्यासाठी दहिवाळ येथील शेतकऱ्यांनी कांदा पिकाची लागवड केली होती. दुष्काळी परिस्थितीत काही दिवसांपूर्वी गिरणा धरणात आरक्षित केलेले पाणी २८ मार्च ते ८ एप्रिलपर्यंत आवर्तन सोडण्यात येणार आहे. या पाण्यातून गिरणा नदी काठावरील ठेंगोडा, ब्राह्मणगाव, लखमापूर तसेच डाव्या कालव्यातून रावळगाव गावांना ६.८२ दलघफू पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. सोमवारी मध्यरात्री मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणारी महापालिकेची भूमिगत जलवाहिनी दहिवाळ गावाच्या जवळ फुटल्याने ऐन दुष्काळी परिस्थिती लाखो लिटर पाणी गेले.

Show More
Back to top button
error: Content is protected !!