
पाचोरा : रोटरी क्लब पाचोरा भडगाव कडून महा रक्तदान शिबीर

प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त डिस्ट्रिक्ट 3030 मधील 116 क्लब मध्ये आज एकाचवेळी रक्तदान शिबीर आयोजित करून रोटरीने एक जागतिक कीर्तिमान स्थापित केला. यावेळी एस डी पी ओ रोहम साहेब, तहसीलदार विजय बनसोडे, नगरपालिका मुख्याधिकारी मंगेश देवरे, पोलीस निरीक्षक राहुल पवार, नगरपालिका उपमुख्याधिकारी मराठे, आरोग्य निरीक्षक, नगरपालिका कर्मचारी यासोबत रोटरी क्लब पाचोरा भडगाव अध्यक्ष डॉ मुकेश तेली,सचिव डॉ अजयसिंग परदेशी,रोटरी सदस्य डॉ गोरख महाजन,भरत सिनकर,डॉ प्रशांत सांगडे,डॉ सिद्धांत तेली,डॉ पंकज शिंदे, डॉ शिवाजी शिंदे,संजय कोतकर,प्रज्ञेश खिलोशिया,नितीन तायडे,पिंकी जिनोदिया,चिंतामण पाटील,ज्ञानेश्वर पाचोळे,पुंडलिक पाटील,लक्ष्मण जाधव,गणेश सैंदाणे,चेतन सरोदे,अमोल पाटील यासोबत रेड प्लस ब्लड बँक जळगावचे सदस्य उपस्थित होते.यावेळी 67 रक्तपिशवी रक्तसंकलन केले गेले.सर्व रक्तदाता यांचा 1 लाख रुपये विमा असून सर्व रक्तदाता यांना पाण्याचे जार भेट दिले गेले.अशा रीतीने संपूर्ण रोटरी डिस्ट्रिक्ट3030 मधील 116 क्लब यांनी रक्तदान शिबीर आयोजित करून एक नवा कीर्तिमान स्थापित केला गेला.













