धारातीर्थ गडकोट मोहीम
नरवीर तानाजी मालुसरे समाधीस्थळ उमरठ ते छत्रपती शिवाजी महाराज समाधी स्थळ रायगड.
मुंबई प्रतिनिधी
पोलादपूर : वारकरी संप्रदाय कुळाचार असलेल्या आणि हिंदवी स्वराज्याचा इतिहास घडलेल्या या रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्याच्या पुण्यभुमीत पहिल्यांदाच.
धारातीर्थ गडकोट मोहीम
दिनांक – ७ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी २०२५
एकत्र येण्याचे ठिकाण: उमरठ, ता. पोलादपूर, जिल्हा रायगड.*मोहीम मार्ग:*- नरवीर तानाजी मालुसरे समाधीस्थळ उमरठ ते छत्रपती शिवाजी महाराज समाधीस्थळ रायगड.
मोहीम म्हणजे काय .?
तर श्री शिव-शंभूछत्रपतीं चरणी आयुष्यातील प्रत्येक क्षण पूर्णतः समर्पित जीवन जगण्याची घेतलेली शपथ..धारातीर्थ गडकोट मोहीम का महत्वाची आहे
शिव-शंभू रक्तगटाचा समाज तयार करण्याचा विचार डोळ्यांसमोर ठेवून राष्ट्रहितासाठी, राष्ट्रसंरक्षणासाठी हा देह आपण अर्पण केला पाहिजे.
यासाठी संस्कारित करणारे विद्यापीठ म्हणजे धारातीर्थ गडकोट मोहीम उपक्रम.वरील धारातीर्थ गडकोट मोहीमे मध्ये मोठ्या संख्येने आवश्य सहभागी व्हा!
0 2,531 1 minute read