
आता सुट्ट्या पैशांवरुन कंडक्टर आणि प्रवासी यांच्यामध्ये वाद होणार नाहीत.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा नामी तोडगा.मुंबई प्रतिनिधी
मुंबई : : सुट्ट्या पैशांवरुन प्रवाशांच्या तक्रारी आणि वाहकांना होणारा त्रास यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेतली आहे. त्यांनी केलेल्या सूचनेनुसार सुट्ट्या पैशांवरुन वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होऊ नये, यासाठी एसटीने प्रवाशांना यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढण्याचे आवाहन केले आहे.
या आवाहनाला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून मागील काही दिवसांपासून यूपीआय पेमेंटद्वारे मिळणारे उत्पन्न दुपटीने वाढले आहे. त्यामुळे वाहक आणि प्रवासी यांच्यात सुट्ट्या पैशावरुन होणारे वाद टाळले जाऊ शकतात.