
राज्याला लवकरच मिळणार तिसरा उपमुख्यमंत्री… संजय राऊत.?
मुंबई प्रतिनिधी
मुंबई : उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे सेनाच फुटीवर असल्याचा दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे. दावोस दौऱ्यात महाराष्ट्रीतील गुंतवणुकीची चर्चा न होता महायुतीमधील भूकंपाची चर्चा अधिक रंगली. दुसरीकडे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे गटाला भगदाड पाडण्याचा दावा केला असतानाच आज संजय राऊत यांनी महाराष्ट्र राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार असा गौप्यस्फोट करून टायर मधील हवाच काढून घेतली.