
नवी मुंबई: शिवसेनेचे आमदार राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्याकडील सिडको अध्यक्षपदाचा पदभार काढण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीआधी त्यांची सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती.
मात्र, आता त्यांची मंत्रिपदी नियुक्ती झाल्याने पूर्वीच्या पदभारातून त्यांना मुक्त करण्यात आले आहे. सिडको अध्यक्षपदाच्या अल्पकाळात शिरसाट यांनी अनेक निर्णय घेतले. त्यापैकी काही निर्णय वादग्रस्त ठरले. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरही त्यांनी सिडको अध्यक्षपदाची सूत्रे स्वत:कडेच ठेवली होती.