
भारत विकास परिषद विदर्भ प्रांता तर्फे नागपूर येथे दोन दिवसिय कार्यशाळेचे आयोजन 18 व 19 मे रोजी करण्यात आले होते. हा कार्यक्रम दादा
डिढोळकर भवन पांडे लेआउट येथे संपन्न झाला . या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान नवीन कृपलानी भारत विकास परिषद विदर्भ प्रांत उपाध्यक्ष यांनी भूषवले तर मार्गदर्शक म्हणून चंद्रशेखरजी घुशे राष्ट्रीय सेवा प्रकल्प प्रमुख तसेच क्षेत्रीय महिला सहभागीता निलिमा बावणे हे व्यासपीठावर विराजमान होते. या कार्यशाळेत भारत विकास परिषदेच्या प्रांत व राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची विविध विषयांवर मार्गदर्शनपर भाषणे झाली. यामध्ये सेवा , संस्कार, महिला सहभागीता , बाल संस्कार याचा विशेष समावेश होता . याप्रसंगी प्रांत तसेच शाखा कार्यकारणीचा शपथविधी सुद्धा संपन्न झाला. यात विशेष करून विदर्भ प्रांतातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तीन शाखांचा सन्मान करण्यात आला . यात भारत विकास परिषद ऑरेंज सिटी शाखा जी महिलांची शाखा आहे या शाखेचा नाविन्यपूर्ण कार्यक्रमाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार ऑरेंज सिटी शाखा अध्यक्ष आसावरी दिलीप वरकड यांनी संपूर्ण शाखे च्या वतीने स्वीकारला . या कार्यशाळे करिता उपाध्यक्ष संपर्क रश्मी नशीने, सहसचिव सचिन लिमसे , शाखा माझी अध्यक्ष सौ छाया शुक्ला तसेच राजश्री बाबर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.