प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर,मालेगाव : येथील सुप्रसिद्ध कवी व लेखक संजय मुकूंदराव निकम यांचे काव्य योग काव्य संस्था,पुणे तर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.संजय मुकूंदराव निकम यांच्या माय मराठी या कवितेने रसिकांना अंतर्मुख करायला लावले.अप्रतिम लेखन करणारे प्रतिभा शाली कवी व लेखक संजय मुकूंदराव निकम यांचा मैडल व विशेष सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला. सुखाची सावली या प्रातिनिधिक कवींच्या काव्य संग्रहात माय मराठी या संजय मुकूंदराव निकम यांच्या हायकु कवितेला प्रथम स्थान देण्यात आले.योगेश हरने यानी प्रमूख पाहुण्यांचा परिचय करुन दिला.शुभागी सोमनाथ जाधव यानी सुखाची सावली प्रतिनिधिक काव्यसंग्रह सुंदर असे नमुद केले.संपादक योगेश हरने यानी आपले मनोगत व्यक्त केले .महाराष्ट्र व बाहेरील राज्यातील कवी च कवयत्री यांचा त्यानी उपस्थित श्रोत्यांशी परिचय करुन दिला..सर्य कवी व कवयत्री यानी आपल्या कविता सादर केल्या.बनेश्वर पर्यटन केंद्र पुणे येथे हे पहिले निसर्ग कवी समेलन मोठ्या थाटात संपन्न झाले.कवयत्री चारुता प्रभुदेसई यानी ऊपस्थित रसिक श्रोते यांचे आभार मानले.कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.