प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर,नाशिक : सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध वाङ्मयीन पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. गुरुवारी (दि. २१) सायंकाळी ६ वाजता परशुराम साईखेडकर नाट्यगृहात ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.
सावानाचे प्रमुख सचिव देवदत्त जोशी यांनी ही माहिती दिली आहे. सावानातर्फे विविध वाङ्ममयीन पुरस्कारांचे वितरण केले जाते. यंदा कांदबरी गटातील धनंज कुलकर्णी यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार ‘हास चक्र’ या पुस्तकाचे लेखक डॉ. अरुण गद्रे, ललितेतर ग्रंथ गटातील वि. म. गोगटे पुरस्कार ‘डॉक्टर ऑन अ वॉर फ्रन्ट’ या पुस्तकाचे लेखक डॉ. भरत केळकर, सामाजिक,
वैचारिक गटातील मु. ब. यंदे पुरस्कार ‘कट्टा मॉडेल’ या पुस्तकाचे लेखक डॉ. मिलिंद वाटवे, लघुकथासंग्रह गटातील पु. ना. पंडित पुरस्कार ‘गांधी वादाचा केमिकल लोचा’ या पुस्तकाचे लेखक लक्ष्मीकांत देशमुख, कथालेखक उमेदीने लेखन गटातील डॉ. अ. वा. वर्टी यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार ‘हिट्स ऑफ नाइन्टी टू’ या पुस्तकाचे लेखक पंकज भोसले, चरित्रात्मक कादंबरी गटातील अशोक टिळक यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार डॉ. शुभदा कुलकर्णी, प्रवास, शैक्षणिक गटातील ग. वि. अकोलकर पुरस्कार ‘मुलांचे व्यक्तिमत्त्व साकारताना’ या पुस्तकाचे लेखक सचिन उषा विलास जोशी यांना, तर अनुवादित साहत्यावर आधारीत वि. दा. सावरकर पुरस्कार ‘रवींद्रनाथ टागोरांची पत्रे’ या पुस्तकाचे लेखक विलास गिते यांना जाहीर झाला आहे. त्याचप्रमाणे बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी (दि. १९) सायंकाळी ६ वाजता होणार आहे. यंदाचा पुरस्कार श्रीकांत बोजेवार यांना जाहीर झाला आहे. कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. ‘सक्सेस मंत्र ऑफ ब्राह्मोस’ या ए. पिल्लई यांच्या इंग्रजी मूळ पुस्तकाच्या अनुवादासाठी ज्येष्ठ लेखक अनुवादक अभय सदावर्ते यांना २०२३ चा उत्कृष्ट साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यानिमित्त त्यांचा हृद्य सत्कार प्रा. दिलीप फडके व ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते होणार आहे. बुधवारी (दि. २०) मराठी गाण्यांचा ‘भावस्पर्श’ हा कार्यक्रम विवेक केळकर सहकारी सादर करतील.
या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन सावाना अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव, डॉ. सुनील कुटे, कार्याध्यक्ष अॅड. अभिजित बगदे, प्रमुख सचिव देवदत्त जोशी, सहसचिव जयेश बर्वे, अर्थ सचिव गिरीश नातू, ग्रंथ सचिव जयप्रकाश जातेगावकर, सांस्कृतिक सचिव संजय करंजकर, नाट्यगृह सचिव सुरेश गायधनी, वास्तुसंग्रहालय सचिव प्रेरणा बेळे आदींनी केले आहे.