
माळशिरस तालुक्यातून म्हसवड या ठिकाणी व्यवसायासाठी गेलेल्या बौद्ध तरुणाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना समोर आलेली आहे . .
किरकोळ वादावरून तुझी वस्ती उठवेन , तू बाहेरून आलेला आहे , तुझ्याकडे बघतोच अशी भाषा अमीर मुल्ला राहणार म्हसवड या व्यक्तीने केल्यानंतर,
भैय्यासाहेब उर्फ लिंगेश्वर सातपुते राहणार म्हसवड यांनी मी एक आंबेडकरवादी कार्यकर्ता आहे तुमच्या अशा धमक्यांना घाबरणारा नाही , असे म्हटल्यानंतर तू कशावरून आंबेडकरवादी आहे , आंबेडकरवादी म्हणून कशाला गु खातोस , परत तसलं आंबेडकरांचे नाव घेतलं तर याद राख.. असे म्हणत त्यांना शिवीगाळ करत करत त्यांना मारहाण केली.
मला का मारले याचा जाब विचारला असता , तू आंबेडकरांचे नाव घेतल्यामुळे मी मजबूर झालो तुला मारायला अशी केलेली भाषा व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे .. सदरची घटना 24 jul 2026 रोजी दुपारी घडलेली आहे ..












