महाराष्ट्र

आंबेडकरवादी आहे म्हणल्यामुळे शिवीगाळ व मारहाण

म्हसवड मध्ये बौद्ध तरुणाला शिवीगाळ व मारहाण

माळशिरस तालुक्यातून म्हसवड या ठिकाणी व्यवसायासाठी गेलेल्या बौद्ध तरुणाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना समोर आलेली आहे . .

किरकोळ वादावरून तुझी वस्ती उठवेन , तू बाहेरून आलेला आहे , तुझ्याकडे बघतोच अशी भाषा अमीर मुल्ला राहणार म्हसवड या व्यक्तीने केल्यानंतर,

भैय्यासाहेब उर्फ लिंगेश्वर सातपुते राहणार म्हसवड यांनी मी एक  आंबेडकरवादी कार्यकर्ता आहे तुमच्या अशा धमक्यांना घाबरणारा नाही , असे म्हटल्यानंतर तू कशावरून आंबेडकरवादी आहे , आंबेडकरवादी म्हणून कशाला गु खातोस , परत तसलं आंबेडकरांचे नाव घेतलं तर याद राख.. असे म्हणत त्यांना शिवीगाळ करत करत त्यांना मारहाण केली.

मला का मारले याचा जाब विचारला असता , तू आंबेडकरांचे नाव घेतल्यामुळे मी मजबूर झालो तुला मारायला अशी केलेली भाषा व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे .. सदरची घटना 24 jul 2026 रोजी दुपारी घडलेली आहे ..


 

Show More
Back to top button
error: Content is protected !!