
परभणी जिल्हा जिंतुर तालुक्यातील टाकळखोपा येथे ग्राम सभा आयोजन करण्यात आले त्यावेळी ग्राम सेवक श्री गजमल साहेब सरपंच सौ अनुसया ताई श्री रामे तसेच ग्रामपंचायत प्रमुख श्री विश्वनाथ घुगे ग्रामपंचायत सदस्य श्री रावसाहेब घुगे पोलिस पाटील श्री कृष्णा दळवे व सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते यावेळी श्री विश्वनाथ घुगे यांनी मागील कामाची माहिती दिली व नवीन काय योजना आल्या सर्व कामा विषयी माहिती दिली व प्रधान मंत्री आवास योजना सर्वांना त्याचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील असे आवाहन गावकरी मंडळींना केले व पाणी पुरवठा विषयावर चर्चा केली असता ग्राम पंचायत प्रमुख श्री विश्वनाथ घुगे काही दिवसांतच आपल्याला पाणी टंचाई निर्माण होणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले व सर्व गावकरी मंडळींचे आभार मानले.