कल्याण डोंबिवली महानगर पालिका शास्त्रीनगर सामान्य रुग्णालयात नागरिकांचा कडाडून विरोध असतांना देखील उदघाटन करून स्थानिक रहिवाशी यांना नाराज करून एक प्रकारे मतदान राजाला नाराज करून देखील एवढ्यावर नथांबता स्थानिक युवकांना डावलून शव विच्छेदन विभागात कंत्राटी पद्धतीने कर्मचारीनची भरती करण्यात आली. तसेच रुग्णालयात काही जुने डॉक्टरांचा देखील शव विच्छेदन विभागाला विरोध होता त्याच कारणाने काही डॉक्टरांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत. सदर विषयी रुग्णालय प्रशासन कोणत्याच प्रकारची जबाब दारी घेण्यास नाकारत आहेत. मा. आयुक्त साहेब यांनी शास्त्रीनगर रुग्णालयात झालेल्या कंत्राटी भरतीत स्थानिक युवकांना सामावून घ्यावे हीच युवकांची अपेक्षा.