उल्हासनगर : महापालिकेतील मंजूर ३२५६ पैकी १३०५ पदे रिक्त असल्याने, महापालिका कारभार कंत्राटी कामगारांच्या हाती जाण्याची भीती व्यक्त होत आहे. वर्ग-१ च्या ३६ पैकी २३, वर्ग-२ च्या २१ पैकी १३ तर वर्ग-क च्या ७३५ पैकी ४६० पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत.
उल्हासनगर महापालिकेत एकून ३२५६ पदे मंजूर असून त्यापैकी १३०५ पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. तर यावर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्याने, भविष्यात महापालिका कारभार कंत्राटी कामगारांच्या हाती जाण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. महापालिकेत सरळसेवा भरती वर्षानुवर्षे न झाल्याने, रिक्त पदाची टक्केवारी ४० पेक्षा जास्त झाली. गेल्या महिन्यात अभियंता, अग्निशमन दल सुरक्षारक्षक आदी १५८ पदे भरण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली. त्या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती मुख्यालय उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. तर महापालिका कारभार चालविण्यासाठी नाईलाजास्तव सेवानिवृत्त अधिकारी, कंत्राटी कामगारांची भरती खाजगी ठेकेदारा मार्फत सुरू आहे. कर्मचारी कमी असल्याने, महापालिका प्रभाग समिती क्रं-३ मधील अंतर्गत साफसफाईचे खाजगीकरण करून वर्षाला १२ कोटी रुपये खर्च केले जात आहे.
शासनाकडे अधिकाऱ्यांची मागणीमहापालिका आयुक्त अजीज शेख यांनी शासनाकडे प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांची मागणी केली. मात्र शासनाकडून अध्यापही अधिकारी मिळाले नाही.