
जळगाव शहरातील शनिपेठ, कांचन नगर, भागातील असोदा गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली असून शनिपेठ ते चोफुली प्लॉट या १००० मिटर अंतराच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. संबंधित विभागाने वेळीच लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी समस्त नागरिक करीत आहेत.
असोदा – भादली गावांना जोडणारा रस्त्याची दुरावस्था झाली असून अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या मार्गावरील पाच गावातील नागरीकांना उद्योग, व्यवसाय, शाळा, नोकरी, रुग्णालय महाविद्यालयीन शिक्षणासाठी जळगाव शहरात यावे लागते. अशा या खड्डेमय झालेल्या रस्तावरुन जीव मुठीत घेत जीवघेणा प्रवास करावे लागत असून रात्रीच्या वेळी खड्डय़ाचा अंदाज येत नसल्याने सातत्याने अपघात होत आहेत. १०-१५ किमी अंतरावर पाच किलोमीटरच्या अंतरावरती खड्डे पडल्यामुळे वाहन चालवत असताना चालकांना कसरत करावी लागत आहे.