
चाळीसगाव पोलिसांनी पकडला अडीच लाखाचा गांजा
क्रूझर गाडीसह 4 अटकेत
सर्व आरोपी महादेव दोडंवाड तालुका शिरपुर जिल्हा धुळे येथील रहवासी एनडीपीएस ऍक्ट कलम 29, 20 (बी), 8(सी) प्रमाणे गुन्हा दाखल
चाळीसगावात बेकायदेशीर रित्या अंमली पदार्थ गांजा ची पांढऱ्या रंगाची फोर्स कंपनीची टेक्स क्रूझर गाडी क्रमांक एम एच 18 बी एक्स 8943 मध्ये वाहतुक करणाऱ्या चौघांना चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक अमीतकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल भुपेश वंजारी, नितिन वाल्हे, विनोद पाटील, पोलीस कन्स्टेबल पवन पाटील, निलेश पाटील, प्रविण पवार, प्रथमेश पाटील, दिपक चौधरी, विजय महाजन यांनी दिनांक 17 रोजी रात्री 2.50 वाजेच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ,सिग्नल पॉईंट येथे ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून
2 लाख 57 हजार 416 रुपये किमतीचा गांजा सह 12 लाखाची गाडी असा 14 लाख, 57 हजार 416 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नूतन पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ हे रुजू झाल्यापासून कारवाईचा धडाका सुरु आहे त्यामुळे अवैध व्यावसाईकांचे धाबे दणानले आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक सिग्नल पॉईंट येथे दि 17 रोजी रात्री नाकाबंदी दरम्यान 2.50 वाजेच्या सुमारास भडगाव कडुन नांदगाव कडे जाणारी एक फोर्स कंपनीची टेक्स क्रूझर पांढऱ्या रंगाची गाडी क्रमांक एम एच 18 बी एक्स 8943 आल्याने पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता वाहनाचे सीट खाली असलेल्या प्लॅस्टीकच्या थैल्यामध्ये 2 लाख 57 हजार 416 रुपये किंमतीचा 32 किलो 177 ग्रॅम वजनाचा गांजा मिळुन आला क्रूझर मधील राहुल पहाड्या पावरा वय 23, अकतारसिंग शिवदास पावरा वय 24, रविंद्र पंडीत पावरा वय 20, पहाडसिंग कुमार पावरा वय 24 सर्व राहणार महादेव दोडंवाड तालुका शिरपुर जिल्हा धुळे यांना ताब्यात घेवुन त्यांचेविरुध्द पोलीस कॉन्स्टेबल पवन पाटील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा रजिस्टर नंबर 307/ 2025 एनडीपीएस ऍक्ट कलम 29, 20 (बी), 8(सी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास पोलीस उप निरीक्षक योगेश माळी करीत आहेत.