
दिवा शहरामध्ये स्मार्ट एज्युकेशन इंग्लिश शाळा मध्ये 10 वर्षीय मुलगी वार विनयभंगा च्या पर्यंत केळा गेळा होता त्या नंतर दिवा शहर मधली 65 अनाधिकृत शाळा असून त्या अनाधिकृत शाळेच्या विरोधात कारवाई करण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते अरविंद कोठारी आणि बहुजन समाज पार्टीचे कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्ष मा.दीपक भाऊ खंदारे सतत शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करत होते. त्यामुळे ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग उपायुक्त सचिन सांगळे व शिक्षण अधिकारी कमलाकांत म्हेत्रे यांनी लेखी स्वरूपात आदेश दिला आहे की दिवा शहरातील अनाधिकृत शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांचे प्रवेश मान्यता प्राप्त शाळेमध्ये करण्यासाठी 9 नियोजन पथक तयार केले आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत सन 2025-26 मध्ये सदर अनधिकृत शाळा सुरू राहणार नाही याची दक्षता घेणार आहेत. अनधिकृत शाळेच्या विषयी मा. मुख्यमंत्री मा. आयुक्त ठाणे महानगरपालिका व मा. आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या गंभीर व सक्त सूचना आहेत तसेच मा. उच्च न्यायालयाने दिनांक 30/ 1/ 2025 रोजी यासंदर्भात ठाणे महानगरपालिका वर कट्टर शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. तसेच चालू शैक्षणिक वर्षातील वार्षिक परीक्षा पार पडतात अनधिकृत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश नजीकच्या मान्यता प्राप्त शाळेत करून देणार आहेत व शासन मान्यता
मिळेपर्यंत सर्व अनाधिकृत शाळा तात्काळ बंद करून शासन नियमानुसार पुढील प्रशासकीय व फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. वरील कामी पालकांनी आवश्यक ते सहकार्य करावे व संबंधित विद्यार्थी शाळा प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी अशी आवाहन केले आहे.