
7
ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा प्रभाग समिती हद्दीत सर्वाधिक ६७ अनधिकृत शाळा असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. सर्व अनधिकृत शाळा /संस्था चालकांवर फौजदारी गुन्हा नोंदवण्याचे आदेश व अनधिकृत शाळांच्या संस्था चालकांकडून हमीपत्र सादर करून घेण्याच्या हालचाली सुरु असल्याचे सांगितले जात असतानाच दिवा-आगासन रोड वरील B.R नगर जवळ असलेल्या S.M.G स्कूल समोरच एक नवीन अनधिकृत शाळा सुरु होत असल्याने ठाणे महापालिकेच्या कार्य पद्धती बाबत दिवेकरांमध्ये चर्चेला उधाण आले असून येत्या काळात ठा.म.पा चे शिक्षण विभाग या नवीन अनधिकृत शाळेबाबत कोणती कठोर कारवाई करणार याच्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महानगरपालिकेने सर्व अनधिकृत शाळांचे नळ जोडणी कापण्याचे आदेश व अतिक्रमण विभागाला नव्याने सुरु होणाऱ्या अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असतानाही नवीन अनधिकृत शाळा उघडल्या जात असल्याने पालिका प्रशासनाच्या कारभारावरच आता नागरिक प्रश्न उपस्थित करू लागले आहेत.