
<span;>भोकरदन पंचायत समिती येथे ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना मंजुरीचे प्रमाणपत्र आमदार संतोष पाटील दानवे व माजी रेल्वेमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले
<span;>केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री मा. ना. श्री. अमितभाई शहा यांच्या शुभहस्ते व मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआवास अभियान 2024-25 अंतर्गत “प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-2” मधील राज्यातील 20 लक्ष लाभार्थ्यांना घरकुलाचे मंजुरी पत्र व 10 लक्ष लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरणाचा गृहोत्सव कार्यक्रम बालेवाडी, पुणे येथून संपन्न झाला.
<span;>या कार्यक्रमास पंचायत समिती भोकरदन येथून मा. केंद्रीय मंत्री मा. श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्यासह ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहत सर्वांशी संवाद साधला. महाआवास अभियान अंतर्गत भोकरदन तालुक्यात 10,070 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले असून आज सदर लाभार्थ्यांना मंजुरी पत्रक व 7,100 लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला.याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष गणेश पाटील ठाले, मा. पंचायत समिती सभापती विनोद पाटील गावंडे, गटविकास अधिकारी श्री. सुरडकर व सरपंच अजबराव हिंमतराव पा नवल
यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व लाभार्थ्यांची उपस्थिती होती.