
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या याचिकेची कोर्टाकडून दखल.
महाराष्ट्र विधानसभेच्या वाढीव मतदानावर निवडणूक आयोगाला कोर्टाची नोटीस.
दोन आठवड्यात उत्तर द्या कोर्टाने निवडणूक आयुक्तांना बजावले.मुंबई प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून आजही मोठा संशय व्यक्त केला जात आहे. निवडणुकीत वाढलेल्या मतदानावरून आयोगाकडून अजूनही खुलासा झालेला नाही. अशातच वंचित आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी दाखल केलेल्या याचिकेची दखल हायकोर्टाने घेतली आहे. हायकोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांना नोटीस बजावली असून 2 आठवड्यात खुलासा सादर करावा असे निर्देश कोर्टाने दिले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात मतदान कसं वाढलं याबद्दल हायकोर्टात याचिका दाखल आहे. आज न्यायमूर्ती अजय गडकरी,न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणूक 2024 मधे 76 लाख मतांचा डेटा आमच्याकडे उपलब्ध नाही, असं उत्तर केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलं होतं. एवढंच नाहीतर सायंकाळी 5 ते 6 या वेळेत झालेल्या 76 लाख मताचा डाटा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे उपलब्ध नाही, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे वाढलेलं 76 लाख मतांचा हिशेब नाही का? असा सवाल ऍड प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.