प्रशांत गायकवाड रिपोर्टर महाराष्ट्र
- लोहारा नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष आयुब शेख यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा नगराध्यक्षा वैशालीताई खराडे यांच्याकडे सुपुर्द केला
लोहारा – लोहारा नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दि. २९ जानेवारी २०२५ रोजी नगराध्यक्षा वैशालीताई अभिमान खराडे यांच्याकडे सुपुर्द केला. नगराध्यक्षा वैशालीताई खराडे यांनी राजीनामा मंजुर केला. लोहारा नगरपंचायतच्या सभागृहात उपनगराध्यक्ष आयुब शेख यांनी पत्रकार परिषदचे आयोजन केले होते. पत्रकार परिषद झाल्यानंतर त्यांनी नगराध्यक्ष यांच्याकडे राजीनामा दिला. आयोजित पत्रकार परिषदेत उपनगराध्यक्ष आयुब शेख बोलताना म्हणाले कि, लोहारा नगरपंचायत प्रभाग द क्रं. १५ मधुन जनतेने निवडुन देऊन
मला जनसेवेची संधी दिली. यापुर्वी माझी पत्नी नाजमिन शेख यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळाली. यानंतर मलाही पक्षाच्या वतीने उपनगराध्यक्ष पदाची
संधी मिळाली. याबद्दल
मि पक्षश्रेष्ठीचे व माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करतो. आज पक्षश्रेष्ठीच्या आदेशानुसार पक्ष संघटनात्मक वाढीकरीता मला जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. यामुळे मि नगरपंचायत
कारभारामध्ये मि पुर्ण वेळ देऊ शकत नसल्याने मी माझ्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा राष्ट्रीवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश (दाजी) बिराजदार यांच्याकडे राजीनामा दिला असुन पक्षश्रेष्ठीच्या आदेशानुसार आज नगराध्यक्षा वैशालीताई खराडे यांच्याकडे राजीनामा सुपुर्द करीत आहे. यापुढे नगरसेवक या नात्याने
मी जनसेवेसाठी सदैव कार्यरत राहीन, अशी ग्वाही पत्रकार परिषदेत दिली. आजतगायत राजकीय जिवनात केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी नगरसेवक जालिंदर कोकणे, नगरसेवक दिपक मुळे, माजी नगरसेवक हरी लोखंडे, आश्रपाक शेख, जहिर खुटेपड, नयुम सवार, निहाल मुजावर, सरफराज इनामदार, अब्दुल शेख, फेरोज शेख, अदि उपस्थित होते.