कृषिधाराशिवमहाराष्ट्रलातूर

सोयाबीन खरेदीसाठी शासनाने दिली मुदत वाढ

हमीभाव केंद्रावर सोयाबीन खरेदी साठी मुदत वाढ

प्रशांत गायकवाड, रिपोर्टर धाराशिव

धाराशिवः सोयाबीन खरेदीसाठी ३१ जानेवारी असलेली मुदत ६ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.

यावर्षी धाराशिव जिल्ह्यात ४ लाख ६२ हजार ८७२ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या सोयाबीनला योग्य भाव मिळावा यासाठी जिल्ह्यात २१ शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

सुरुवातीला हवामान बदलामुळे सोयाबीन खरेदी केंद्रावर घेऊन जाता आलेलं नसल्याकारणामुळे शेतकरी चिंतेत होते. ३५ हजार ४०३ शेतकऱ्यांनी नोंदणी करूनही केवळ २१ टक्क्यांहून कमी शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करण्यात आले होते.

देवेंद्र फडणवीस आणि पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या सहकार्याने ६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मिळवून दिली आहे. यामुळे, राज्यातील तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Show More
Back to top button
error: Content is protected !!