मुंबई, दादर : टोरेस ज्वेलरी घोटाळा Torres Jewellery scam : कोट्यवधींची फसवणूक करून गुंतवणूकदारांना सोडून टोरेस ज्वेलरी मालक पळून गेला.
मुंबईतील दादर परिसरात एक मोठा आर्थिक घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबईतील दादर परिसरातील टोरेस कंपनीने* हजारो मुंबईकरांना गंडवले आहे. आर्टिफिशल डायमंड विकणाऱ्या टोरेस कंपनीने लोकांना आठवड्याला 6 टक्क्यांपासून 10 टक्क्यांपर्यंत परतावा देण्याचे अमिष दाखवून लाखो रुपये गोळा केले. त्यानंतर गुंतवणूकदारांची फसवणूक करून पसार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला कंपनीकडून काही परतावा देण्यात आला. मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून कंपनीकडून काहीच परतावा न मिळाल्याने हा घोटाळा उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.