
प्रतिनिधी विराम पवार मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते मंत्रिपद मिळालं नसल्याने छगन भुजबळ नाराज आहेत.
भुजबळ यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवत पक्ष सोडण्याचे संकेतही दिले आहेत. मात्र, भुजबळ हे खरोखरच मंत्रिपदासाठी नाराज आहेत का.?
असा सवाल छगन भुजबळ यांना केला असता त्यांनी वेगळाच गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली आहे. मी अनेक पदं भूषविली आहेत. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि विरोधी पक्षनेतेपदही भूषविलं आहे. मी काही मंत्रिदावरून नाराज नाही. मला ज्या पद्धतीने पक्षात वागणूक दिली जात आहे. त्यामुळे मी नाराज आहे. मी काय तुमच्या हातातील खेळणं आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी पक्ष नेतृत्वाला केला आहे.
. मी ज्येष्ठ आमदार आणि मंत्री आहे. मी शोभेचं मंत्रिपद कधीच स्वीकारलं नाही. असं असताना मला डावलण्याचं काही कारण नव्हतं. मंत्रिमंडळात जुनं आणि नवीन यांचा मेळ घालावा लागतो. जुने झाले द्या फेकून असं चालत नाही, असा घणाघाती हल्लाच छगन भुजबळ यांनी केला आहे.