महाराष्ट्रलातूर

लातूर. निवडणुकांची भाजपाची तयारी

माजी IPS अधिकारी भाजपमध्ये, महाराष्ट्रातून लोकसभेचे तिकीट?

BJP Loksaba Election | माजी IPS अधिकारी प्रताप दिघावकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. धुळे मतदार संघातून डॉ. भामरेसह अर्धा डझन उमेदवार भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. त्यात आता प्रताप दिघावकर यांनी तयारी सुरु केली आहे.मालेगाव, मनोहर शेवाळे, दि. 14 फेब्रुवारी 2024 | भारतीय जनता पक्षात इनकमिंग सुरु आहे. नुकतेच काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल झाले. त्यानंतर आता राज्यसभेचे तिकीट मिळणार असल्याची चर्चा आहे. राजकीय नेते नाहीच तर आयपीएस अधिकारी भाजपमध्ये दाखल होऊ लागले आहे. माजी IPS अधिकारी प्रताप दिघावकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर धुळ्यातून त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. माजी केंद्रीय मंत्री डॉ सुभाष भामरे या मतदार संघातून भाजपकडून निवडून आले होते. धुळे मतदार संघातून डॉ. भामरेसह अर्धा डझन उमेदवार भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत.
भाजपकडून उमेदवारीची चर्चा
माजी आयपीएस अधिकारी आणि एमपीएससीचे माजी सदस्य प्रताप दिघावकर यांनी भाजपमधे काही दिवसांपूर्वी प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर आता भाजपकडून त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू झाल्याची चर्चा आहे.

डॉ. सुभाष भामरे यांची वाट बिकट
धुळ्यात भाजपच्या उमेदवारीसाठी प्रताप दिघावकर यांनी मतदार संघाचा दौरे सुरु केले आहे. त्यांनी गाठीभेटींवर भर देणे सुरु ठेवले आहे. इच्छुक व त्यांच्या समर्थकांकडून ठिकठिकाणी फलकबाजी करुन वातावरण निर्मिती केली जात आहे. भाजपचे धक्कातंत्र येथे लागू झाल्यास विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांची वाट बिकट होणार आहे. मोदी सरकारमध्ये ते संरक्षण राज्यमंत्रीसुद्धा राहिले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी धुळे मतदार संघात भाजपच्या उमेदवारीसाठी आधीच अर्धा डझन इच्छुकांमध्ये तीव्र स्पर्धा असताना भाजप नेमकी काय खेळी खेळणार हे पाहणे महत्वाचे आहे.
भारतीय जनता पक्षाने राज्यात मिशन ४५ सुरु केले आहे. महायुतीच्या माध्यमातून ४८ पैकी ४५ जागा निवडून आणण्याची रणनीती तयार केली गेली आहे. यासाठी त्या त्या भागांतील प्रबळ व्यक्तीला भाजपची दारे खुली केली आहे. यामुळे आता दिघावकर यांना उमेदवारी मिळणार का? हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.

Show More
Back to top button
error: Content is protected !!