ताज़ा ख़बरें

चाळीसगावात नगरपालिका प्रशासनाचा बेजबाबदार कारभार

गतिरोधकाच्या अभावामुळे समाजसेवक रिकी मुरपानी चा मुलगा आयरन गंभीर जखमी

चाळीसगावात प्रशासनाचा बेजबाबदार कारभार

गतिरोधकाच्या अभावामुळे समाजसेवकाचा मुलगा गंभीर जखमी


चाळीसगाव प्रभाग क्रमांक ११ मध्ये सिंधी कॉलनी येथील नागरिकांनी वारंवार मागणी करूनही गतिरोधक बसवण्याकडे प्रशासनाने पूर्ण दुर्लक्ष केले.अखेर या बेपर्वाईचा परिणाम म्हणून गंभीर अपघात घडला असून,सामाजिक कार्यकर्ते रिकी सोनार यांच्या मुलाला भरधाव दुचाकीस्वाराने धडक दिली आणि तो गंभीर जखमी झाला आहे.
आर्यन रिकी सोनार यावर उपचार सुरु आहे.नगरपालिका प्रशासन आणि संबंधित विभागाच्या निष्काळजी पणामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे,असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. अनेक वेळा निवेदन देऊन वो लेखी मागणी करूनही गतिरोधक बसविण्याचे आश्वासन देऊन प्रशासनाने केवळ वेळ मारून नेली.पण आज झालेल्या अपघाताने प्रशासनाचा बेजबाबदार कारभार उघड झाला आहे.

स्थानिकांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे की – “जर तात्काळ गतिरोधक बसवून नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेतली नाही,तर आम्हाला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल.”आता तरी प्रशासन जागे होईल का? की अजूनही एखाद्याचा जीव गेला पाहिजे, तेव्हाच कारवाई होणार? असा सवाल नागरिकांनी केला आहे.

Show More
Back to top button
error: Content is protected !!