
मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाळा मराठी शिकणं गरजेचं नाही.?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैयाजी जोशी यांचे संतापजनक वक्तव्य.
मुंबई : विराम पवार
मुंबई: मुंबईसह राज्यात मराठी सक्तीची मागणी होत असताना दुसरीकडे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्याने केलेल्या वक्तव्याने नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबईत मराठी शिकणे गरजेची नसल्याचे वक्तव्य संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केले. त्याशिवाय, गुजराती ही घाटकोपरची भाषा असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. विशेष यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा हेदेखील उपस्थित होते. भैय्याजी जोशी यांच्या या वक्तव्याने नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील विद्याविहार येथील एका कार्यक्रमात भैय्याजी जोशी बोलत होते.भैय्याजी जोशी यांनी म्हटले की, मी मंगल प्रभात लोढा यांचे अभिनंदन करतो,या ठिकाणी आल्यावर मला महाराणा प्रताप यांचे नाव डोळ्यासमोर आलं. महाराणा प्रताप आणि अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल आपण ऐकलं आहे. ज्यांच्याबद्दल आज आपण ऐकलं आहे, असे जाम साहेब सुद्धा आहेत. आपल्यातल्या अनेकांनी त्यांना पाहिलं आहे. मुंबई ते कन्याकुमारी त्यांनी काम केलं आहे. जामसाहेब यांचे नाव या संस्थेला आहे, हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे.बिर्ला मंदिर अनेक ठिकाणी आहेत, बिर्ला यांनी अनेक मंदिर बांधले पण आतमध्ये देवता कोण आहे, त्यात जाऊन पहावं लागतं. चांगलं जीवन साधनेमधूनच प्राप्त होतं. अशा प्रकारची मधुरता त्यांच्या बोलण्यात होती असेही त्यांनी म्हटले.भैय्याजी जोशी यांनी आपल्या संबोधनात म्हटले की, मुंबईत विविध राज्य, प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात. मुंबईत अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही, असे वक्तव्य भैय्याजी जोशी यांनी केले.