महाराष्ट्रमुंबई

शिवसेना ठाकरे पक्षाला विरोधी पक्ष नेते पद मिळण्याचा मार्ग मोकळा.

मोठी बातमी.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विधिमंडळाकडून चांगली बातमी

विरोधीपक्षनेते पद मिळण्याचा मार्ग मोकळा.

मुंबई : विराम पवार

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले होते. महायुतीचे 232 आमदार निवडून आले. दुसरीकडे महाविकास आघाडीचा दारुन पराभव झाला. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला विधिमंडळाच्या एकूण सदस्यांपैकी दहा टक्के आमदार निवडून आणता आले नाही. त्यामुळे राज्याच्या विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद नसणार, अशी चर्चा सुरु होती. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने विधिमंडळाला पत्र लिहिले होते. त्याचे सकारात्मक उत्तर ठाकरे गटाला मिळाले आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
विधानसभेत दहा टक्के जागा असल्याशिवाय विरोधी पक्षनेतेपद दिले जात नाही. यासंदर्भात काही नियम आहे का. त्याची माहिती घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 25 नोव्हेंबर 2024 रोजी विधिमंडळ सचिवांना पत्र लिहिले होते.
त्या पत्राला उत्तर विधिमंडळाकडून मिळाले आहे. त्यानुसार महाराष्ट्र विधानसभा नियमात अशी कोणती तरतूद नाही. त्यामुळे दहा टक्के संख्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. आता विधानसभेत ठाकरे यांच्या शिवसेनेतून कोणाला विरोधी पक्षनेतेपद मिळणार त्याची चर्चा सुरु झाली आहे.

Show More
Back to top button
error: Content is protected !!